मुंबई : स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा आवाज कायमचाच हरपला असून ६ फेब्रुवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याच पार्श्वभूमीवर बोलत असतांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. लता मंगेशकरांनी आंबेडकरांची गाणी गायली नाही, हे त्या जिवंत असताना विचारायला हवं होतं, असे आंबेडकर म्हणाले आहेत.
प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना लता मंगेशकर यांनी आंबेडकरी गाणे गायली नाहीत या प्रश्नाला उत्तर देत प्रकाश आंबेडकर म्हणाले की,‘लता मंगेशकरांनी आंबेडकरांची गाणी गायली नाही, हे त्या जिवंत असताना विचारायला हवं होतं. त्यांनी आंबेडकरांची गाणी गायली नाहीत, तशीच त्यांनी सरदार पटेल आणि नेहरुंचीही गाणी गायली नाही,’ असे आंबेडकर यावेळी म्हणाले.
दरम्यान, पुढे शाहरुख खानच्या फुंकर विषयी विचारण्यात आले असता ते म्हणाले की,‘मी मुस्लिम व्यक्तींच्या प्रेतयात्रेला गेलोय. तेव्हा मी बघितलंय की अनेक ठिकाणी फुंकर घातली जाते.हे देशाचे वैविध्यपूर्ण कल्चर आहे. तसेच ज्यांना पटत नसेल त्यांनी शांत रहावं’, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- ‘तेरा जाना दिल के अरमानो का लूट जाना…’, संजय राऊतांनी व्यक्त केल्या भावना
- नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी
- “काँग्रेस नेत्यांनी देशभर कोरोना पसरवला”, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
- “इंग्रज परतले परंतु तोडा आणि राज्य करा ही वृत्ती काँग्रेसला देऊन गेले”
- बच्चू कडूंवर भ्रष्टाचाराचे आरोप; वंचित बहुजन आघाडीची राज्यपालांकडे चौकशीची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

