मुंबई: तब्बल २४ वर्षांच्या मोठ्या कालखंडानंतर ऑस्ट्रेलियाचा पुरुष क्रिकेट संघ पाकिस्तानचा दौरा करणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाने जाहीर केलेल्या संघात अनेक मोठे खेळाडूंचे नाव शामिल आहे. यात डेव्हिड वॉर्नर , मिशेल स्टार्क , स्टीव्ह स्मिथ अशा मोठ्या नावांचा समावेश आहे. या दौऱ्यासाठी पॅट कमिन्सला ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. पाकिस्तान दौऱ्यात ऑस्ट्रेलिया तीन कसोटी, तीन वनडे आणि एक टी-२० सामना खेळणार आहे.
जवळपास दोन दशकांनी ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तानच्या धर्तीवर पाऊल ठेवणार आहे. २००९ मध्ये श्रीलंकेच्या कसोटी संघावर झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय सामने खेळणे बंद करण्यात आले होते. मात्र क्रिकेट-वेड्या पाकिस्तानने परदेशी संघांना परत आकर्षित करण्यासाठी काही वर्षात खूप संघर्ष केला आहे. २०१५ पासून पाकिस्तान त्यांचे घरेलू सामने युएईच्या मैदानावर खेळत होते. मात्र आता ऑस्ट्रेलियाने दौरा करायचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना आशेचा किरण दिसला आहे.
पाकिस्तान दौरा जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघासाठी हा दौरा थोडा कठीण जाऊ शकतो. लँगर यांच्यानंतर अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांची अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या आधी दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे सारखे संघही पाकिस्तानमध्ये खेळले आहेत. परंतु काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड संघाने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचा दौरा रद्द केला होता.
महत्वाच्या बातम्या
- वर्ल्डकप संघात निवड न झाल्याने “हि” महिला क्रिकेटर आता खेळणार हॉकी
- “शिवाजी पार्कला स्मशानभूमीमध्ये…”, लतादीदींच्या स्मारकाच्या वादावर आंबेडकरांची प्रतिक्रिया
- “तुमच्या राजकारणासाठी त्याचा बळी…”, लता मंगेशकरांच्या स्मारकावरुन मनसेची प्रतिक्रिया
- “…हे लता मंगेशकर जिवंत असताना विचारायला हवं होतं”, प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य
- T20 WC 2022 : …आणि काही मिनिटांतच विकली गेली भारत-पाक सामन्याची तिकिटं; एकाची किंमत होती ‘इतकी’!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

