🕒 1 min read
मुंबई: स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar)यांचे (६ फेब्रु.) रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यानंतर भाजप आमदार राम कदम यांनी लता मंगेशकर यांचे स्मारक उभारावे अशी मागणी केली असून त्यावर आता राजकीय क्षेत्रातून बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत.
भाजपा व काँग्रेसने या मागणीला पाठिंबा दिला असून भारिप बहुजन महासंघाचे अॅड. प्रकाश आंबेडकर (Bharipa Bahujan Mahasangha Adv Prakash Ambedkar) यांनी शिवाजी पार्क मैदान हे खेळासाठीच असावे, असे म्हणत आपला या मागणीला विरोध असून मुंबईत आधीच मुलांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध नाहीत अशा वेळी शिवाजी पार्क मैदानात स्मारक उभारणे चुकीचे ठरेल, असे म्हटले आहे.
तसेच “या मागणीला माझा विरोध आहे, शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच राहिलं पाहिजे. त्याला स्मशानभूमीमध्ये कनव्हर्ट करु नये या मताचा मी आहे. बाजूला एक स्मशानभूमी असून ती चांगलीच मोठी आहे.”,असेही त्यांनी म्हटले आहे.
राम कदम यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र-
भाजप आमदार राम कदम यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, “भारतरत्न दिवंगत स्वर्गीय लता दिदी यांच्यावर शासकीय इतमामात शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे त्याच जागी शिवाजी पार्कावर गानकोकिळा भारतरत्न स्वर्गीय लतादिदी यांचे स्मृतीस्थळ उभारून त्यांच्या स्मृती कायमस्वरुपी जतन कराव्यात ही नम्र विनंती मी कोट्यवधी संगीतप्रेमी आणि लतादिदींच्या चाहत्यांच्या वतीने करत आहे. तरी तातडीने त्यांच्या विनंतीचा, भावनेता सन्मान करावा आणि त्याच ठिकाणी जगाला प्रेरणा देणारे स्मृतीस्थळ उभारावे.” आता या मागणीला राजकीय वळण मिळाले असून अनेक राजकीय प्रतिक्रिया यावर उमटत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- T20 WC 2022 : …आणि काही मिनिटांतच विकली गेली भारत-पाक सामन्याची तिकिटं; एकाची किंमत होती ‘इतकी’!
- अरे..व्वा! विदर्भातील शेतकऱ्याचा मुलगा थेट झळकला फोर्ब्स मासिकात
- काँग्रेसला महागाईची चिंता “यूपीए’’ सरकारच्या काळात का नव्हती?- पंतप्रधान मोदी
- मोदींनी ‘चुनावजीवी’ स्वभाव काही सोडलेला नाही; राष्ट्रवादीची टीका
- बच्चू कडूंवर भ्रष्टाचाराचे आरोप; वंचित बहुजन आघाडीची राज्यपालांकडे चौकशीची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
