मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्फोटक फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्स लवकरच क्रिकेटनंतर हॉकी खेळताना दिसणार आहे. मार्च-एप्रिलमध्ये न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी जेमिमाहची भारतीय संघात निवड झाली नव्हती. तिच्या निराशेचंच कारण असेल कि तिने आता हॉकी खेळायचा निर्णय घेतला आहे.
भारतीय महिला संघाची विस्फोटक फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्स ११ ते १६ फेब्रुवारी दरम्यान मुंबईतील विलिंग्डन कॅथोलिक जिमखाना रिंक स्पर्धेत अंकल्स किचन युनायटेड स्पोर्ट्स टीमकडून लवकरच हॉकी खेळताना दिसणार आहे. अंकल्स किचन युनाइटेड स्पोर्ट्स संघाने जेमिमाहचा हॉकी स्टिक घेऊन फोटो पोस्ट केला आहे.
https://twitter.com/krithika0808/status/1490624907344228359?s=20&t=EFBuIwqzSLf38Rl0L1KIFw
जेमिमाह रॉड्रिग्सने शालेय जीवनापासून हॉकी आणि क्रिकेट दोन्ही खेळात प्राविण्य मिळवले आहे. क्रिकेटमध्ये उच्च स्तरावर पोहोचण्यापूर्वी, ती मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये इंटर स्कूल लीग स्तरावर वांद्रे येथील सेंट जोसेफ स्कूलकडून खेळली आहे. याशिवाय तिने हॉकीमध्ये अंडर १७ स्तरावर मुंबई आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. ती आजकाल हॉकीसाठी ड्रिब्लिंग, पासिंग आणि स्कोअरिंगचा सराव करत आहे. महिला क्रिकेट वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा झाली होती ज्यात जेमिमाहची निवड करण्यात आली नव्हती.
महत्वाच्या बातम्या
- T20 WC 2022 : …आणि काही मिनिटांतच विकली गेली भारत-पाक सामन्याची तिकिटं; एकाची किंमत होती ‘इतकी’!
- अरे..व्वा! विदर्भातील शेतकऱ्याचा मुलगा थेट झळकला फोर्ब्स मासिकात
- काँग्रेसला महागाईची चिंता “यूपीए’’ सरकारच्या काळात का नव्हती?- पंतप्रधान मोदी
- मोदींनी ‘चुनावजीवी’ स्वभाव काही सोडलेला नाही; राष्ट्रवादीची टीका
- बच्चू कडूंवर भ्रष्टाचाराचे आरोप; वंचित बहुजन आघाडीची राज्यपालांकडे चौकशीची मागणी


