Share

मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी दरेकरांना दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

Published On: 

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांना मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी मोठा दिलासा मिळाला असून त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टाकडून मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी सत्र न्यायालयाने दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

प्रविण दरेकर यांच्यावर मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अटकपूर्व जामीन अर्जावर आज (१२ एप्रिल) हायकोर्टात सुनावणी झाली. तसेच यावेळी दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टाकडून मंजूर करण्यात आला.

दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे (Dhananjay Shinde) यांच्या तक्रारीवरुन दरेकरांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सुमारे २० वर्षे सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे. मुंबै बँकेची निवडणूक झाली त्यावेळी मजूर म्हणून प्रविण दरेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे दरेकरांनी बँकेच्या हजारो ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!