मुंबई : सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेच्या नावाखाली भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांनी गोळा केलेल्या वर्गणीचे पैसे लाटल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केल्यानंतर किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना चौकशीला हजर राहण्यासाठी मुंबई पोलिसांकडून नोटिसीद्वारे आदेश देण्यात आले होते. परंतु किरीट सोमय्या हे त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दिल्लीला गेले असल्याची माहिती त्यांच्या वकीलांनी दिली. यावरून संजय राऊत यांनी किरीट सोमय्या मुलासह फरार झाले आहेत, असा आरोप केला. दरम्यान, या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी अप्रत्यक्षपणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात क्लाईड क्रास्टो यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘किरीट सोमय्या बेपत्ता असल्याची शहरात चर्चा आहे. पण ‘Z plus’ सीआयएसएफ सुरक्षा असलेला माणूस बेपत्ता होऊ शकत नाही कारण केंद्रीय गृहमंत्रालयाकडे त्यांच्या ठावठिकाण्याची माहिती निश्चितपणे असेल.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘जर किरीट सोमय्या लपत असतील तर तपास यंत्रणांना आवश्यकता असेल तेव्हा माहिती देणे हे केंद्रीय गृहमंत्रालयाचे कर्तव्य आहे.’
महत्त्वाच्या बातम्या –
- अटकपूर्व जामिनासाठी प्रविण दरेकर हायकोर्टात, आज होणार सुनावणी
- संपर्क क्षेत्राच्या बाहेर असलेले सोमय्या ‘ON TWITTER’; संजय राऊतांच्या आरोपांचे खंडन करत दिले आव्हान
- “दंगल पेटवायचीच असेल तर अगोदर स्वतःच्या मुलाला…”, सुजात आंबेडकरांचे राज ठाकरेंना खुले आव्हान
- “एकत्र येऊन शरद पवारांच्या पाठीशी उभं राहावं लागेल”, अमोल मिटकरींचे आवाहन
- “दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राम्हण असतात”, सुजात आंबेडकरांचे विधान


