Share

“… पूरस्काराने मोदींचा बहुमान वाढला आणि पुरस्काराचाही”, प्रवीण दरेकरांचे विधान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कारांची (Lata Dinanath Mangeshkar Award) घोषणा करण्यात आली आहे. मंगेशकर कुटुंबातर्फे उषा मंगेशकर यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवरच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारे ट्वीट केले आहे.

“पहिला ‘लता दिनानाथ मंगेशकर’ पुरस्कार देशाचे लोकप्रिय प्रधान सेवक, संपूर्ण आयुष्य जनसेवेला वाहणारे नरेंद्र भाई मोदी यांना जाहीर झाल्याबद्दल देशातील सर्व थरातून आनंद व्यक्त होतो आहे. मी देखील या आनंदात अतिशय अभिमानाने सहभागी आहे. लतादीदी आणि मोदीजी दोन्हीही उत्तुंग व्यक्तिमत्वे आहेत. या पूरस्काराने मोदींजींचा बहुमान वाढला आणि पुरस्काराचाही. या दोन्ही विभूतींना प्रणाम.”, असे ट्वीट प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी केले आहे.

२४ एप्रिल रोजी मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यास पंतप्रधानांनी सहमती दर्शवल्याची माहिती देखील उषा मंगेशकर यांनी दिली आहे. नरेंद्र मोदी लतादीदींना बहीण मानायचे. नरेंद्र मोदी देशसेवा करत आहेत, जे काम करत आहेत ते पाहूनच त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे उषा मंगेशकर यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या:

निवडणूका जवळ आल्यावर तुम्हाला मुंबईचे पाणी कसं आठवलं? आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल

“‘झेड प्लस’ सुरक्षा असलेला माणूस बेपत्ता होऊ शकत नाही कारण…” राष्ट्रवादीचे टीकास्त्र

संपर्क क्षेत्राच्या बाहेर असलेले सोमय्या ‘ON TWITTER’; संजय राऊतांच्या आरोपांचे खंडन करत दिले आव्हान

अटकपूर्व जामिनासाठी प्रविण दरेकर हायकोर्टात, आज होणार सुनावणी

“दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राम्हण असतात”, सुजात आंबेडकरांचे विधान

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!