Share

निवडणूका जवळ आल्यावर तुम्हाला मुंबईचे पाणी कसं आठवलं? आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुंबई महापालिकेने पाणीपुरवठा संदर्भात नवा निर्णय घेतला आहे. अधिकृत झोपडीधारक, खासगी जमिनीवरील अघोषित झोपडीधारक, सरकारी जमिनींवरील झोपडीधारक यांना आता जलजोडणी देण्यात येणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पालिका मुख्यालयात याबाबत घोषणा केली आहे. यावरच आता भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्वीट करत अनेक सवाल केले आहेत.

“बरं आता निवडणूका जवळ आल्यावर तुम्हाला मुंबईचे पाणी कसं आठवलं? त्यामुळे कुछ तो गडबड है…पाणी कुठेतरी मुरतेय? बहुतेक समुद्राचे पाणी गोडे करण्याचे कंत्राट द्यायचे आहे, म्हणून तर पाण्याची गरज निर्माण केली जात नाही ना? पाणी रे पाणी तेरा रंग कैसा? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

https://twitter.com/ShelarAshish/status/1513722643668779008

तसेच मुंबईतील सर्व झोपडपट्ट्यांना पाणी द्यायला हवे याबाबत न्यायालयाने चर्चा केली होती त्यामुळे आता सर्वांना पालकमंत्री पाणी देणार हा मुद्दा नवीन नाही. बरं सर्वांना देणार म्हणता मग मुंबईतील कोळीवाडे, गावठाणांचा उल्लेख का करीत नाही. आमच्या या मुळ मुंबईकरांवर राग आहे का? असा खोचक सवालही आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

संपर्क क्षेत्राच्या बाहेर असलेले सोमय्या ‘ON TWITTER’; संजय राऊतांच्या आरोपांचे खंडन करत दिले आव्हान

अटकपूर्व जामिनासाठी प्रविण दरेकर हायकोर्टात, आज होणार सुनावणी

“दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राम्हण असतात”, सुजात आंबेडकरांचे विधान

“एकत्र येऊन शरद पवारांच्या पाठीशी उभं राहावं लागेल”, अमोल मिटकरींचे आवाहन

“दंगल पेटवायचीच असेल तर अगोदर स्वतःच्या मुलाला…”, सुजात आंबेडकरांचे राज ठाकरेंना खुले आव्हान

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!