मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप करत INS विक्रांत संबंधी मोठा खुलासा केला होता. सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेच्या नावाखाली किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांनी गोळा केलेल्या वर्गणीचे पैसे लाटल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना चौकशीला हजर राहण्यासाठी मुंबई पोलिसांकडून नोटिसीद्वारे आदेश देण्यात आले होते. परंतु किरीट सोमय्या हे त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दिल्लीला गेले असल्याची माहिती त्यांच्या वकीलांनी दिली. संजय राऊत यांनी सोमय्या पिता-पुत्रांवर निशाणा साधत त्यांना शोधण्यासाठी लूकआऊट नोटीस जारी करण्यात यावी अशी मागणी केली होती.
आता किरीट सोमय्या गायब असल्याचे म्हटले जात असतानाच स्वतः सोमय्या यांनी ट्वीटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊत यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. “सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमे अंतर्गत फक्त ११ कोटी जमा करण्यात आले होते. १० डिसेंबर २०१३ साली आम्ही सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिम राबवली. मात्र आज १० वर्षांनंतर संजय राऊत म्हणत आहेत की, ५८ कोटी जमा झाले. यापूर्वीही संजय राऊत यांनी ७ आरोप केले आहेत. मात्र एकाचाही पुरावा मुंबई पोलिसांकडे नाही. १७ डिसेंबर २०१३ साली जेव्हा आपण राष्ट्रपती यांना भेटलो तेव्हा शिवसेना नेते गोपीनाथ मुंडेही सोबत होते. त्यामुळे ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणे बंद होणार नाही. आम्ही या विरोधात हायकोर्टात जाणार.”, असा इशारा किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत दिला आहे.
दरम्यान काल प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले होते की,‘किरीट सोमय्या मुलासह फरार झाले आहेत. न्याय यंत्रणेवर दबाव आणुन सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात हे ठग आहेत. न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्र तयार केली तरी सत्याचाच विजय होईल. प्रश्न इतकाच की. हे दोन ठग कोठे आहेत? मेहुल चोकसी प्रमाणे पळून तर गेले नाहित?’, तसेच आयएनएस विक्रांतच्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून राज्यातच नाही तर राज्याबाहेरही पैसे गोळा करण्यात आले आहे. तसेच चुकीचे काम केलं तर राजभवनाची उरली सुरली इज्जतही जाईल, असेही राऊत यावेळी म्हणाले होते.
संजय राऊत यांचे आरोप काय?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी INS विक्रांत प्रकरणाबाबत मोठा खुलासा करत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. आयएनएस विक्रांतसाठी किरीट सोमय्यांनी कोट्यवधी रुपये जमा केले. त्यासाठी लाखो लोकांनी पैसे दिले. स्वतः किरीट सोमय्यांनी 57 कोटी रुपये जमा केले. पण हे पैसे राजभवनात जमा झालेच नाहीत. असा आरोप राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
अटकपूर्व जामिनासाठी प्रविण दरेकर हायकोर्टात, आज होणार सुनावणी
“दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राम्हण असतात”, सुजात आंबेडकरांचे विधान
“एकत्र येऊन शरद पवारांच्या पाठीशी उभं राहावं लागेल”, अमोल मिटकरींचे आवाहन
“दंगल पेटवायचीच असेल तर अगोदर स्वतःच्या मुलाला…”, सुजात आंबेडकरांचे राज ठाकरेंना खुले आव्हान
“मद्यधुंद अवस्थेतील काही लोक…”, सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी अमोल मिटकरींचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

