Share

‘सरकारची अवस्था दारुड्याप्रमाणे झाली, त्यामुळे गडकिल्ले विकायला काढलेत’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील गढ किल्यांवर खासगी विकसकांना हॉटेल्स आणि रिसॉर्ट उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून २५ किल्ल्यांची यादी तयार करण्यात आली आहे. राज्य मंत्रीमंडळाडून ३ सप्टेंबर रोजी नव्या धोरणाला संमती दिली होती. त्यामुळे आता एमटीडीसी राज्य सरकारच्या मालकीचे किल्ले करारावर देऊ शकते. यावर अनेक नेत्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे.

याविषयी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. त्यांनी या सरकारची संपूर्ण तिजोरी खाली झाली आहे. त्यांची अवस्था दारुड्याप्रमाणे झाली आहे. त्यामुळे त्यांनी आता गडकिल्ले विकायला काढले आहेत अशा शब्दात सरकारवर टीका केली आहे. ते नागपूर येथे एका वृत्त वाहिनीशी बोलत होते.

दरम्यान सरकारच्या या निर्णयावरून अनेक नेत्यांनी भाष्य केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातल्या गड किल्ल्यांना हात लावायची हिंमतही करू नका. तसे केल्यास महाराष्ट्रातले इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी हे सहन करणार नाहीत. सरकारला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. सरकारला जर उत्पन्नच हवे असेल तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावे असं विधान केले आहे.

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असलेल्या किल्ल्यांना नख सुद्धा लागू देणार नाही. गडकिल्ले लग्नसोहळ्यांसाठी भाड्याने देण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही असं स्पष्टीकरण दिले आहे. सरकारच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे गैरसमज झाला आहे असं त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!