टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीत फुट पडली आहे. एमआयएम पक्ष स्वबळावर लढणार आहे. याबाबतची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आपला मान राखला नाही असे इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे.
याविषयी बोलताना जलील यांनी वंचितच्या निर्णयाची किती दिवस वाट पहायची आणि आठ जागा जर देत असतील का शांत बसायचे का? म्हणून आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं जलील यांनी सांगितले. शिवाय आता तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि आम्ही आमची ताकद दाखवतो, असं विधान करत वंचितला आव्हान दिले आहे.
तसेच पुढे बोलताना जलील यांनी वंचितसोबतची युती तोडण्याचा इतका मोठा निर्णय मी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या परवानगीने शिवाय घेऊ शकत नाही. हा निर्णय पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीच घेतला असल्याचं त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आपल्या कामगिरीची छाप पाडणाऱ्या या दोनही पक्षांची मते आता विभागली गेली आहेत.
दरम्यान, आयएमने घेतलेल्या या निर्णयाचं आरपीएयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वागत केले आहे. त्यांनी गेल्या निवडणुकीत एमआयएमला वंचितमुळे काहीही फायदा झाला नाही, उलट वंचितलाच एमआयएममुळे फायदा झाला होता असं विधान केले आहे. त्यामुळे. एमआयएमने घेतलेला निर्णय हा अत्यंत योग्य आहे असं रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
