टीम महाराष्ट्र देशा : देशाच्या संविधानाच्या विरोधात भाजप व आरएसएसने लढाई उभी केली आहे. मोहन भागवत यांनीही आरक्षणाविरोधी वक्तव्य केले होते. येत्या पाच वर्षाच्या काळात ओबीसींचे आरक्षण संपलेले असेल. त्यामुळे लोकांनी आता जागृत होणे गरजेचे असून ज्यांना आरक्षण नको आहे; त्यांनी भाजपाला मतदान करावे व ज्यांना आरक्षण हवे आहे; त्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन येथे सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या सत्ता संपादन मेळाव्यात ते बोलत होते.
आरएसएस व बीजेपीने संविधानाच्याही विरोधात लढाई सुरू केली असून आरएसएस, भाजप, शिवसेना आरक्षणाच्या विरोधातील पक्ष आहेत. ओबीसी समाजाचे आरक्षण संपले पाहिजे, हे मोहन भागवत यांच्या पोटातील विष बाहेर आले आहे. ओबीसी समाजाला आरक्षण कमीपणाचे वाटते. परंतु, आरक्षण उपकार नव्हे तर विकास करण्याचे साधन असल्याचे मत वंचित प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
सातारा जिल्ह्याला आण्णा नायकवडी यांच्या पराक्रमाचा इतिहास आहे. सरकारच्या काळात त्यांनी तो दाखवून दिलेला आहे. नागनाथ अण्णांच्या लढ्याचा आदर्श वंचित बहुजन आघाडीतील लोकांनी घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज व सयाजीराव गायकवाड महाराज यांनी वंचित दलितांना प्रवाहात सामिल करून घेतले. त्यांना आपल्या सैन्यात स्थान देऊन तलवारीचा मान दिला. मात्र, त्यानंतरच्या पेशवाईने या समाजाला पुन्हा जाती व्यवस्थेकडे आणण्याचे काम केले. सध्या तेच काम आरएसएस व भाजपकडून केले जात आहे. अशी घणाघाती टीका आंबेडकर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मतांच्या बेरजेशिवाय भाजप दुसरं काही करत नाही – जयंत पाटील
- ‘पवारांनी काय केलं, तर जनतेला स्वाभिमानाने उभं राहायला शिकवलं’
- राजेश टोपेंनी पाच वर्षांत काय दिवे लावले- हिकमत उढाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

