Share

पुण्यातील मनसेच्या महाआरतीच्या आयोजनाला स्थगिती; कारण…  

Published On: 

पुणे : काल औरंगाबाद येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा मशिंदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करत मशिदिंवरील भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालिसा वाजवण्याचा इशारा दिला होता. पण या सभेनंतर पुण्यातील मनसेच्या महाआरतीच्या आयोजनाला स्थगिती देण्यात आली आहे.

मशिदींवरील भोंगे उतरवले गेले नाहीतर मनसेच्या प्रत्येक शाखेमध्ये हनुमान चालीसा लावून महाआरती करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला होता. पण उद्या रमजान ईद  आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेनंतर स्थानिक पातळीवर महाआरतीचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. मनसे आणि हिंदुत्ववादी संघटना उद्या अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर प्रत्येक शाखेमध्ये महाआरती करणार होते. पण उद्या ईद असल्यामुळे राज ठाकरे यांनी ४ तारखेपर्यंत भोंगे उतवरण्याचे अल्टीमेटम दिले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर मनसे कार्यकर्त्यांनी उद्या ऐवजी ४ तारखेला महाआरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

३ तारखेला रमजान ईद आहे. मला सणात विष कालवायचे नाही. पण ४ तारखेनंतर ऐकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. मशिदींवरील भोंग्यांचा विषय हा नवीन नाही. यापूर्वीही अनेकांनी तो मांडला आहे. मी फक्त त्याला पर्याय सुचवला आहे. ज्या मशिदींवर लाऊडस्पीकर लावले जातील, त्यांच्या समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा. भोंग्यांचा विषय हा सामाजिक आहे, धार्मिक नाही. त्याला कुणी धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आम्हालाही धर्माचा आधार घेता येतो. असेही राज ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!