अलीगढ : हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी सर्व हिंदूंनी एकत्र येऊन धर्माच्या आधारावर मतदान करावे, असे वादग्रस्त विधान कालीचरन महाराज यांनी केले आहे. अचल ताल, अलिगड येथील रामलीला मैदानावर रविवारी संत समागम परिषदेत वादग्रस्त धार्मिक नेते कालीचरण यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की, भारतात फक्त सनातन धर्म आहे आणि याशिवाय कोणताही धर्म नाही.
कालीचरण महाराज इथेच थांबले नाहीत, ते पुढे म्हणाले की, “इस्लाम आणि ख्रिश्चन हे एकच धर्म नाहीत. देशाला इस्लामच्या दिशेने नेले जात आहे. 800 वर्षात देशात 5 लाख मंदिरे पाडली गेली आणि 80 हजार महिलांवर बलात्कार झाले. देश हिंदु राष्ट्र झाला नाही तर पुन्हा असे होईल. द्वेषाचे राजकारण थांबवा हिंदू राष्ट्राची स्थापना राजकारणातूनच शक्य आहे. इराक, इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सोबतच जगातील अनेक देश मुस्लिम राष्ट्र बनले.”
महात्मा गांधींचा केला होता अपमान
यापूर्वी कालीचरण महाराज यांनी डिसेंबर महिन्यात महात्मा गांधींचा अपमान केला होता. त्यांनी बापूंविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरले होते, त्यानंतर त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यांनी छत्तीसगडमध्ये महात्मा गांधींना शिवीगाळ करून संबोधित केले होते.
कोण आहेत कालीचरण महाराज?
कालीचरण यांचे खरे नाव अभिजित धनंजय सराग असून ते महाराष्ट्रातील अकोल्यातील शिवाजी नगर येथील रहिवासी आहे. छत्तीसगडमध्ये ते महात्मा गांधींना शिव्या दिल्याने चर्चेत आले होते. यानंतर कालीचरण यांना पोलिसांनी मध्य प्रदेशातील छतरपूर येथून अटक केली होती. जवळपास तीन महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्यांना जामीन मिळू शकला. तुरुंगातून सुटल्यानंतरही कालीचरण महात्मा गांधींवर केलेल्या विधानावर ठाम होते.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

