Share

IPL 2022 SRH vs CSK : मॅच जिंकत असताना कॅप्टन धोनी तापला; ‘या’ खेळाडूवर काढला राग!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली, चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा (SRH vs CSK) १३ धावांनी पराभव केला. या सामन्यात चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (99) आणि डेव्हॉन कॉनवे (85*) यांनी शानदार कामगिरी करत १८२ धावांची सलामी दिली. ‘कॅप्टन कूल’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या धोनीने मात्र सामन्याच्या शेवटच्या षटकात आपला संयम गमावला आणि युवा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीवर राग काढला.

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मोसमातील ४६व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने २ गडी गमावून २०२ धावा केल्या. हैदराबाद संघाने १९ षटकांत ६ बाद १६५ धावा केल्या होत्या. डावाच्या शेवटच्या षटकासाठी कर्णधार धोनीने चेंडू मुकेश चौधरीकडे सोपवला. निकोलस पूरन फलंदाजी करत होता आणि त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. यानंतर पुढच्याच चेंडूवर चौकार मारून अर्धशतक पूर्ण केले. तिसऱ्या चेंडूवर एकही धाव झाली नाही आणि चौथा चेंडू वाईड असल्याचे पाहून धोनीला राग आला.

त्यानंतर पुढच्या दोन चेंडूंवर पूरनने षटकार ठोकला. शेवटच्या चेंडूवर एक धाव मिळाली आणि हैदराबाद संघाने या षटकात २४ धावा काढल्या, त्यामुळे त्यांची एकूण धावसंख्या ६ गडी बाद १८९ अशी झाली. अशाप्रकारे चेन्नईने तिसरा विजय नोंदवला असून त्यांचे आता ९ सामन्यांत ६ गुण झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!