मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच अजून किती महागाई आणि बेरोजगारी वाढविणार तुम्ही?, असा सवालही पटोले यांनी पंतप्रधान मोदींना केला आहे.
यासंदर्भात नाना पटोले यांनी ट्विट केले असून ते म्हणाले आहेत की,‘केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी बारा वर्षे लागणार आहेत. मोदीजी आणखी किती महागाई आणि बेरोजगारी वाढविणार तुम्ही?’, असा सवाल पटोलेंनी केला आहे.
केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी बारा वर्षे लागणार आहेत. मोदीजी आणखी किती महागाई आणि बेरोजगारी वाढविणार तुम्ही?
— Nana Patole (@NANA_PATOLE) May 2, 2022
दरम्यान, ‘वीज, गॅस उत्पादन, पाणी पुरवठा, व्यापार, हॉटेल्स, वाहतूक, प्रसारणाशी संबंधित संवाद सेवा या क्षेत्रांची मोदी सरकारच्या काळात पार वाताहत झाल्याचे रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालात म्हटले आहे’, असेही पटोले यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “राज ठाकरे सुपारी बहाद्दर”, किशोरी पेडणेकरांचे टीकास्त्र
- धर्माच्या आधारावर मतदान करा; कालीचरण महाराजांचे वादग्रस्त विधान
- “मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं…”; अमृता फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
- देवेंद्र फडणवीसांच्या टीकेवर किशोरी पेडणेकर यांचे प्रत्युत्तर; म्हणाल्या,“बाबरीबाबत सर्व रेकॉर्ड…”
- “इतरांना श्रेय देऊन चुकीचा इतिहास पेरल्या जात असेल तर…”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ दाव्यानंतर मिटकरींचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

