Share

“…पण त्यांनी समाधीचा जीर्णोद्धार केलाच नाही”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा नवा खुलासा

Published On: 

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल १ मे रोजी औरंगाबादेत सभा घेतली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीविषयी मोठे वक्तव्य केले. रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली होती, असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला होता. यामुळे एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. तर या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad ) यांनी ट्वीट करत नवा खुलासा केला आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध आणि त्याचे पूर्ण बांधकाम याबाबतचे सगळे ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध आहेत. त्यावरून हे सिद्ध होते कि लोकमान्य टिळकांनी समाधी बांधण्यासाठी समिती स्थापन केली होती, पैसेही जमा केले होते पण त्यांनी जीर्णोद्धार केला नाही.”, असा खुलासा जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत केला आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार 1926 साली ब्रिटिशांनी शिवाजी स्मारक जीर्णोद्धार समिती ह्या दोघांनी मिळून केला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही खरी संभाजी महाराज यांनी बांधून ठेवली होति पण ती नंतर दुर्लक्षित करण्यात आली .पत्र व्यवस्थित वाचा.”, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. याच्याशी संबंधित पत्रही त्यांनी पोस्ट केले आहे.

दरम्यान रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली होती. त्या लोकमान्य टिळकांकडे तुम्ही ब्राह्मण म्हणून बघणार आहात का? लोकमान्य टिळकांच्या पहिल्या वर्तमानपत्राचं नाव मराठा होते. हे पवारसाहेब कधी सांगणार नाहीत.”, असा टोलाही राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला लगावला होता. यावर आता अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.

महत्वाच्या बातम्या:  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!