Share

पुष्कर जोगच्या ‘अदृश्य’ चित्रपटाचं पोस्टर झालं रिलीज!

Published On: 

मुंबई : बॉलिवूडचे प्रख्यात सिनेमॅटोग्राफर कबीर लाल ज्यांनी आज पर्यंत अनेक गाजलेल्या चित्रपटांची सिनेमॅटोग्राफी केली आहे. त्यात ताल, परदेस, कहो ना प्यार है, वेल कम बॅक यासारखे अनेक चित्रपट आहेत. आता कबीर यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. आता कबीर यांनी मराठी चित्रपट अदृश्यचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट १३ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं असून अभिनेता पुष्कर जोगंने शेअर केले आहे.

चित्रपटाचं पोस्टर शेअर करत पुष्कर म्हणाला, “बॉलिवूडचे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर कबीर लाल ज्यांनी आज पर्यंत ताल, परदेस, कहो ना प्यार है, वेल कम बॅक इत्यादी सारख्या अनेक हिंदी चित्रपटांच्या सिनेमॅटोग्राफीची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे आणि आता त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला मराठी सिनेमा आहे. या चित्रपटाचं पोस्टर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अदृश्य’ हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात पुष्कर जोग, मंजिरी फडणीस,अनंत जोग, उषा नाडकर्णी,अजय कुमार सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर अजय कुमार सिंग आणि रेखा सिंग हे चित्रपटाचे निर्माते आहेत. शाहिद लाल यांनी सिनेमॅटोग्राफीची धुरा सांभाळली आहे. चित्रपटाचे संकलन संजय इंगळे यांनी केले आहे आणि संवाद निखिल कटरे व चेतन किंजाळकर यांनी लिहिले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

“आमदारांना खिरापती वाटल्यासारखं घर वाटणे म्हणजे…”, राम सातपुतेंचा ठाकरे सरकारवर निशाणा

शरद पवारांच्या नातवाचा ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री सोबत फोटो होतोय व्हायरल

“लाखो घरे उध्वस्त होत असताना मुख्यमंत्र्यांना…”, चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र

ठाकरे परिवाराने ‘कोमो स्टॉक’मार्फत सात कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग केले- किरीट सोमय्या

“पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी कामाचा आठवडा पाच दिवसांचा करावा”, रोहित पवारांची मागणी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!