मुंबई: राज्यातील आमदारांसाठी मुंबईत ३०० घरे बांधण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे. या घोषणेनंतर ठाकरे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. आता यावरच भाजप नेते राम सातपुते (Ram Satpute) यांनीही ठाकरे सरकारवर ट्वीट करत निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीज तोडायची आणि आमदारांना खिरापती वाटल्यासारखं घर वाटायचा निर्णय म्हणजे या सरकारच शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळण्यासारखं आहे. आमदारांना घर देऊन खुश करायचा केविलवाणा प्रयत्न हे जुलमी ठाकरे-पवार सरकार करत आहे. अशी टीका राम सातपुते यांनी केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी काही दिवस पूर्वी मांडला होता. मला या गोष्टीचे समाधान आहे कि देशाचा आर्थिक भार सोसणाऱ्या मुंबई रूप पुढे कसं असणार आहे, ते ठरवण्याच्या दृष्टीने कष्टकऱ्यांना आणि झोपडपट्टीवासियांना हक्काची घरे मिळावीत म्हणून ज्या योजना आणल्या आहेत त्यासाठी मी मंत्र्यांचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो’, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनात म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- “किरीट सोमय्यांना थांबवायची हिम्मत तर करून पाहा” – निलेश राणेंचं आव्हान
- ल्यूक बेनेडिक्ट कोण आहे? सोमय्यांचा ठाकरे कुटुंबियांना सवाल
- “पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी कामाचा आठवडा पाच दिवसांचा करावा”, रोहित पवारांची मागणी
- Women’s World Cup : अनस्टॉपेबल ऑस्ट्रेलिया..! स्पर्धेत नोंदवला सलग सातवा विजय
- “…वरून शक्ती कायद्याची अंमलबजावणी कितपत होईल याची शंका”, चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

