Share

“लाखो घरे उध्वस्त होत असताना मुख्यमंत्र्यांना…”, चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र

Published On: 

मुंबई : काल (२४ मार्च) विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सफाई कामगार, झोपडपट्टीवासीयांसह ३०० आमदारांना घरं देणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर ठाकरे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘राज्यात विविध क्षेत्रांमध्ये गंभीर परिस्थिती उद्भवली असताना, लाखो घरे उध्वस्त होत असताना मुख्यमंत्र्यांना आमदारांसाठी ३०० घरे देण्याचं कसं काय सुचू शकतं?’, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच समस्त भाजप महाराष्ट्र या निर्णयाच्या विरोधात आहे, असेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, आमदार पळून जातील आणि सरकार पडेल या भीतीनेच हा वर्षाव केला जात असून मुंबईत माझ्यासारखे आणि सदाभाऊ खोत यांच्यासारखे सोडले तर प्रत्येकाची चार चार घरं आहेत.’ तसेच दोन कोटींचा आमदार निधी कोरोना असतानाही चार कोटी केला, आता पाच कोटी केला. कशासाठी घरं पाहिजेत?, असे प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!