मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी संपूर्ण ठाकरे कुटुंबियांना निशाण्यावर धरत उद्धव ठाकरे परिवार म्हणजे आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी कोमो स्टॉक्स अँड प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नंदकिशोर चतुर्वेदी आणि ल्यूक बेनेडिक्ट यांना २०१९ मधे विकली. असून यात त्यांनी सात कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग केले असल्याचा आरोप केला आहे.
ठाकरे परिवाराने महापालिकेतील घोटाळ्याचे पैसे आणि महा वसुलीचे पैसे पांढरे करण्यासाठी नंदकिशोर चतुर्वेदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला.
कोमो स्टॉप प्रॉपर्टीज लिमिटेड या कंपनीत रश्मी ठाकरे,आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हे अधिकृत पार्टनर आहे. यांनी आदित्य कुलियन यांच्याकडून तीन कोटी कर्ज घेतलं असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. तसेच ही कंपनीदेखील नंदकिशोर चतुर्वेदीची आहे. नंदकिशोर चतुर्वेदी यांचा यातील पार्टनर ल्यूक बेनेडिक्ट असून तो ऑस्ट्रेलियन आहे. ल्यूक बेनेडिक्टकडून कर्ज घेऊन ठाकरे सरकारने कोमो स्टॉक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी २०१४ मध्ये बनवली. आणि २०१९ मध्ये कंपनी पुन्हा नंदकिशोर चतुर्वेदी आणि ल्यूक बेनेडिक्टला विकली. बेनेडिक्ट ऑस्ट्रेलियन आहे म्हणून मला प्रश्न आहे की, यात मनी लॉड्रिंगमध्ये फेराफेरी किंवा याचं वायर रेशन झालेलं तर नाही ना? अशी शंका किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे.
सोबतच हा काळा पैसा आला कुठून? वसुलीचा आहे पालिकेचा आहे?की यशवंत जाधवांचा कॉन्ट्रॅक्टर विमल अगरवालचा? की नालेसफाई कॉन्ट्रॅक्टरचा? असा सवालही किरीट सोमय्यांनी विचारला आहे. इन्कम टॅक्स विभाग, ईडी, कंपनी मंत्रालय सगळ्या ठिकाणी या संबंधात तक्रार दाखल केली असल्याचंही सोमय्या यांनी म्हटले आहे. तसेच अनिल परब यांचा जो भ्रष्ट पैशांनी रिसॉर्ट पाडण्याचा आदेश निघाल्यानंतरही उद्धव ठाकरे ते पाडत नाहीत, तो पाडायला आम्ही उद्या सकाळी आम्ही दापोलीला जाणार आहे.अशी माहिती सोमय्या यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
ल्यूक बेनेडिक्ट कोण आहे? सोमय्यांचा ठाकरे कुटुंबियांना सवाल
“किरीट सोमय्यांना थांबवायची हिम्मत तर करून पाहा” – निलेश राणेंचं आव्हान
‘द कश्मीर फाइल्स’ला विरोध करणाऱ्यांना विवेक अग्निहोत्री यांनी सुनावले खडे बोल!
महाराष्ट्राच्या अविनाश साबळेचा भीमपराक्रम; मोडला स्वत:चाच ऑलिम्पिक रेकॉर्ड!
शिवसेना नेते प्रताप सरनाईकांना ईडीचा दणका; ११.३५ कोटींची संपत्ती जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

