मुंबई : पोलिसांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी कामाचा आठवडा पाच दिवसांचा करावा, पोलिसांच्या घरांचा, आरोग्याचा प्रश्न सोडवावा आणि वार्षिक किरकोळ रजांची संख्या १२ वरुन २० करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी लक्षवेधीद्वारे केली होती.
रोहित पवारांच्या मागणीवर उत्तर देत गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, ‘पोलिसांच्या वार्षिक किरकोळ रजा २० दिवस करण्यासाठी गृह विभागाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवून लवकरच त्याला अंतिम मंजुरी दिली जाईल.’ तसेच तसेच पोलिसांच्या घराचा प्रश्न सोडविण्यासाठी दोन वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरेशी तरतूद केल्यामुळे पोलिसांना लवकरात लवकर घरे मिळतील, असेही आश्वासनही शंभूराज देसाई यांनी दिले.
दरम्यान, लक्षवेधी मांडत असतांना रोहित म्हणाले की, ‘आपल्या मागण्यांसाठी कधीही आंदोलन न करणाऱ्या किंवा काम बंद न करणाऱ्या पोलिसांचे मूलभूत प्रश्न राज्य सरकारने सोडविले पाहीजेत. जे आपले रक्षण करतात, त्यांच्यासाठी राज्याने घर, आरोग्य, सुट्टी आणि कामांच्या तासांबाबत न्याय्य भूमिका घ्यावी. पोलिसांना आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या कॅशलेस हॉस्पिटल्सची संख्या वाढवावी आणि निवृत्तीनंतरही पोलिसांना मेडिक्लेमसारखी सुविधा देता येईल, अशी योजना आखावी’, असे रोहित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- “किरीट सोमय्यांना थांबवायची हिम्मत तर करून पाहा” – निलेश राणेंचं आव्हान
- “आमदार पळून जातील या भीतीनेच…”, चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला जोरदार टोला
- काय सांगता! अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठचे ब्रेकअप! चार वर्षांचं नात संपलं
- Women’s World Cup : अनस्टॉपेबल ऑस्ट्रेलिया..! स्पर्धेत नोंदवला सलग सातवा विजय
- “…वरून शक्ती कायद्याची अंमलबजावणी कितपत होईल याची शंका”, चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर निशाणा


