Share

हनुमान चालीसावरुन पुन्हा वाद होण्याची शक्यता; राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादी नागपुरात आमने-सामने

Published On: 

🕒 1 min read

 नागपूर : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज नागपुरातील रामनगरच्या प्रसिद्ध मंदिरात हनुमान चालीसा आणि आरतीचे पठण करतील. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला त्याच ठिकाणी हनुमान चालीसाचे पठण करण्यासही पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र, राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादीला वेगवेगळ्या वेळा देण्यात आल्या आहेत.

राणा दाम्पत्याने विमानतळ ते रामनगर पर्यंत बाइक रॅलीसाठी परवानगी मागितली होती. ती पोलिसांनी फेटाळून लावली. त्याचबरोबर हनुमान चालीसा पठणासाठी अटींसह परवानगी देण्यात आली आहे. मंदिराच्या आवारात मंजुरीची गरज नाही मात्र बाहेर समर्थकांसह लोकांना एकत्र येण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत, असे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याला राणा दाम्पत्य जबाबदार असेल, असे अटीत म्हटले आहे.

राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेला हा वाद आज आमने-सामने पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर या दोघांनाही लाऊडस्पीकरचा वापर करू देणार नसल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सुमारे एक हजार कार्यकर्ते रामनगर येथील मंदिरात बारा वाजण्याच्या सुमारास जमून हनुमान चालीसा सोबत रामायणाच्या सुंदरकांडाचे पठण करतील. तसेच राणा दाम्पत्याला आवाहन देताना पेठे म्हणाले, पुस्तकाशिवाय हनुमान चालीसा पठण करून दाखवावी.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!