Share

हिंदुत्व धर्म नही, इतिहास हैं.. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमाची मांजरेकरांकडून घोषणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज २८ मे ला जयंती असते. आज जयंतीच्या दिवशीचं औच्युत्य साधून एका नव्या सिनेमाची घोषणा झाली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारीत सिनेमाचे पहिले वहिले पोस्टर आणि मोशन पोस्टर आता प्रदर्शित करण्यात आले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. संदीप सिंह आणि अमित वाधवानी यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका रणदीप हुड्डाने साकारली आहे.

अभिनेता रणदीप हुड्डा याची ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सिनेमात मुख्य भूमिका आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचे पोस्टर आणि मोशन पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरच्या माध्यमातून अभिनेता रणदीप हुड्डाच्या भूमिकेची ओळख करुन दिली आहे. ‘हिंदूत्त्व धर्म नही, इतिहास हैं’ अशी टॅगलाइन या पोस्टरवर देण्यात आली आहे.

महेश मांजरेकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या शुभेच्छा देत या सिनेमात सावरकर यांच्या भूमिकेत रणदीप हुड्डा असल्याचे सांगितले. त्यांनी हे पोस्टर शेअर करताना असे म्हटले आहे की, ‘सावरकरांबद्दल लोकांच्या मनात वेगवेगळ्या आवृत्त्या असू शकतात पण एक चित्रपट निर्माता म्हणून पण मी सावरकरांच्या विचारांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा आणि व्यक्तिरेखा यात सावरकर जसे होते, आहेत आणि राहतील या पेक्षा काही फरक असणार नाही. ते स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यांना विसरता येणार नाही.’

महत्त्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!