Share

IPL 2022 : बटलरची नजर कोहलीच्या ‘विराट’ विक्रमावर, अशी कामगिरी करणारा ठरू शकतो पहिला खेळाडू

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामातील दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. हा सामना शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने २० षटकांत ७ गडी गमावून १५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात जोश बटलरच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर राजस्थानने ३ गडी गमावून १८.१ षटकांत लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. राजस्थानकडून जोस बटलरने ६० चेंडूत नाबाद १०६ धावा ठोकल्या. बटलरने त्याच्या खेळीत १० चौकार आणि ६ षटकार मारले. या खेळीसह बटलरने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. यंदाच्या आयपीएल हंगामातील त्याचे हे चौथे शतक ठरले आहे. त्याने विराट कोहलीच्या एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक शतक ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे.

चार शतकांच्या यादीत बटलर

कोहलीने २०१६ च्या आयपीएलमध्ये चार शतके झळकावली होती. यासह बटलरही कोणत्याही टी-२० लीग किंवा कोणत्याही मालिकेच्या हंगामात सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू बनला आहे. ही कामगिरी करताना त्याने विराटच्या एका हंगामातील चार शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. त्याचबरोबर मायकेल क्लींगर ह्याचा देखील या यादीमध्ये समावेश आहे. त्याने २०१५ टी-२० ब्लास्टमध्ये एका हंगामात तीन शतके झळकावली होती.

कॉर्नर आणि कोहलीला मागे टाकण्याची स्पर्धा

आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विरारच्या नावावर आहे. त्याने २०१६ मध्ये ९७३ धावा केल्या होत्या. त्याच हंगामात वॉर्नरनेदेखील ८४८ धावा केल्या होत्या. बटलरच्या नावावर सध्या ८२४ धावा आहेत आणि आणखी एक सामना खेळायचा शिल्लक आहे. अशा परिस्थितीत त्याची नजर वॉर्नर आणि कोहलीच्या विक्रमावर असणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!