मुंबई – महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नसल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या दहा पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या अवघ्या तीनच दिवसांत रद्द करण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांना पूर्वीच्या ठिकाणी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या बदल्या करताना मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करण्यात आली नव्हती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यातून उद्धव ठाकरेंनी आपली पॉवर दाखवली असून राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला अशी चर्चा आहे. मुंबईतील करोनाचा वाढता कहर लक्षात घेता राज्य शासनाच्या गृह विभागाच्यावतीने बदल्यांचे आदेश जारी केले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेनेतील समन्वयाच्या अभावामुळं या बदल्या रद्द करण्यात आल्या असल्याचं बोललं जातंय.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 2 जुलैला या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. हे सर्व अधिकारी हे मुंबई पोलीस दलातले असून DCP दर्जाचे आहेत. आज या सर्व 10 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश रद्द करण्यात आलेत आणि त्यांना पुर्वीच्याच ठिकाणी राहण्यास सांगण्यात आलं आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी २ जुलै रोजी मुंबईतील १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या होत्या. यात परमजित दहिया, प्रशांत कदम, गणेश शिंदे, डॉ. रश्मी करंदीकर, शहाजी उमप, डॉ. मोहन दहिकर, विशाल ठाकूर, संग्रामसिंह निशाणदार, प्रणय अशोक आणि नंदकुमार ठाकूर यांचा समावेश होता.
बदल्या झालेल्या जवळपास सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या बदलीच्या ठिकाणी पदभार स्वीकारून कामही सुरू केलं होतं. मात्र अवघ्या ४ दिवसात या सर्व पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द करण्यात आल्याने आता महाविकास आघाडीच्या अजब सरकारचा गजब कारभार समोर आला आहे.
मुंबई-पुणे रेल्वेसेवा पूर्ववत होणार, प्रवाशांना दिलासा
आता सीबीएसई व आयसीएसईच्या दहावी, बारावीच्या परीक्षा पण रद्द
#Coronavirus : सिंहगडावरील ‘कोरोना’मुळे ‘हा’ नियोजित कार्यक्रम रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

