🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील सेवा आजपासून पूर्ववत करण्यात येणार आहे. कर्जत ते लोणावळा भागांत अनेक ठिकाणी दरड कोसळणे आणि पाणी साचल्याने ३ ऑगस्टपासून या मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. आता हा मार्ग पूर्ववत झाल्याने मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
रेल्वेच्या मुंबई आणि पुणे विभागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला होता, त्यामुळे रेल्वे मार्गावर दरड कोसळणे तसेच मोठ्या प्रमाणावर पाणी देखील साचले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई ते पुणे धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी गाड्यासह लांब पल्याच्या रेल्वे देखील रद्द करण्यात आल्या होत्या.
Following Mumbai-Pune trains restored to run on 16.8.2019 in proper route.
11010 Pune-Mumbai Sinhagad Exp
11009 Mumbai-Pune Sinhagad Exp
12123 Mumbai-Pune Deccan Queen
12128 Pune-Mumbai Intercity Exp
22106 Pune-Mumbai Indrayani Exp@drmmumbaicr @drmpune— Central Railway (@Central_Railway) August 15, 2019
दरम्यान, मध्य रेल्वेकडून आता मुंबई पुणे मार्गावरील गाड्या सुरु करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस आणि मुंबई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या आजपासून धावणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज : फडणवीस
… म्हणून राज्यातील महापौर-उपमहापौरांच्या निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलल्या
‘जन आशीर्वाद’ यात्रा महत्वाची नाही, सध्या आमच लक्ष पूरग्रस्त सांगली कोल्हापूरकडे – आदित्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

