🕒 1 min read
मुंबई – इंग्रजांच्या जुलमी अत्याचाराच्या विरोधात लाल-बाल-पाल यांनी क्रांती केली तीच क्रांती भाजपप्रणीत केंद्रसरकारच्या विरोधात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि पंजाब या तीन राज्यातून उभी राहिल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात लाल – बाल-पाल या तीन क्रांतीकारकांचा उल्लेख केला होता. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी भाजपचे हे जुलमी सरकार उलथवायला ही तीन राज्ये कारणीभूत ठरणार आहेत असे स्पष्ट केले.
राज्याचे अधिकार जिथे विरोधकांचे सरकार आहे तिथे केंद्रसरकार यंत्रणेचा वापर करून खोट्या केसेस बनवून बदनाम केले जात आहे. जे सनदी अधिकारी आहेत ज्यांचा पीएमओमधून कंट्रोल असतो त्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून सरकारला अडचणीत आणण्याचा खेळखंडोबा हा देशभर सुरू आहे. विशेष करुन पश्चिम बंगाल व महाराष्ट्रात असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
पश्चिम बंगालमधील जनतेने भाजपला दाखवून दिले आहे तर महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे ती दाखवून देईल. तर पंजाबमधूनही क्रांतीला सुरुवात झालीय. जुलमी केंद्रसरकारच्या विरोधात या तीन राज्यात वणवा पेटणार आहे. या परिवर्तनाच्या लढाईत जनता आमच्यासोबत असेल असेही नवाब मलिक म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवारांना आता नवीन माफिया साथीदार मिळाला, तो म्हणजे उद्धव ठाकरे’; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
- देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये – रावसाहेब पाटील दानवे
- एकतर हे वसुली सरकार नोकर भरती काढत नाही, काढली तर गोंधळ घालतं – पडळकर
- ‘दगाफटका करून सत्तेत आलेल नेते कधीच जनहिताचे काम करू शकत नाहीत’
- तरुणाच्या निर्घृण हत्येनंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल; सिंघू बॉर्डर खाली करण्याची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
