मुंबई : राणे-शिवसेना वाद पुन्हा उफाळला आहे. काही आठवड्यापूर्वी चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात मोठा शाब्दिक वाद रंगला होता. यावेळी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांनी एकमेकांवर सडकून टीका केली होती. उद्घाटनावेळी उद्धव ठाकरे नारायण राणे यांच्या कानात काहीतरी बोलले होते.
त्यावेळी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले गोष्टीचा खुलासा होऊ शकला नव्हता. नारायण राणे यांनी शुक्रवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत याबाबतचा गौप्यस्फोट केला. चिपी विमानतळाच्या कार्यक्रमाच्या आदल्यादिवशी नारायण राणे यांनी आपण भांडाफोड करणार, असा इशारा दिला होता. हाच धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी उद्घाटनावेळी नारायण राणे यांच्या कानापाशी जाऊन खोचक टिप्पणी केली होती.
तुम्ही भांडी आणलीत का, असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. हे ऐकल्यानंतर मी आज भांडाफोड करायचीच, असे ठरवले. त्यानंतर मी व्यासपीठावर जाऊन बोललो. माझ्या टीकेनंतर उद्धव ठाकरे अगदी स्टेजवरुन खाली उतरेपर्यंत माझ्याशी एक शब्दही बोलले नाहीत. आमच्या दोघांच्या आसनांमधील अंतरही वाढवण्यात आले, असे नारायण राणे यांनी सांगितले. नारायण राणे यांच्या या टीकेला आता शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांच्या मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज करणार; वकिलांनी दिली माहिती
- कृषी कायद्यांना विरोध करणारे गावातील बेरोजगार दारुडे; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
- किरण गोसावीच्या पोलीस कोठडीत ‘या’ तारखेपर्यंत वाढ
- ‘वसुलीचा पैसा अनिल परब, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे जात होता’
- आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

