Share

“तपास यंत्रणांच्या टार्गेटवर शरद पवारांसह महाविकास आघाडीचे नेते” – संजय राऊत

Published On: 

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर आक्रमक टीका केली आहे. म्हणाले, तपास यंत्रणांना महाराष्ट्रात टार्गेट दिले आहे, अशी टीका करत संजय राऊतांनी तपास यंत्रणांवरच प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच यासह शरद पवारांसह राष्ट्रावादीचे महाविकास आघाडीतील नेते तपास यंत्रणांच्या टार्गेटवर आहेत असा दावाही पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी केला.

महाविकास आघाडीमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार भावना गवळी, प्रताप सरनाईक, आनंदराव अडसूळ यांच्यावर झालेली ईडी कारवाई असो वा राज्यातील ईडी सत्र, यावर बोलताना शिवसेना नेते संजय राऊतांनी एक महत्वाचं विधान केलंय. तपास यंत्रणांना टार्गेट दिलं जातंय, असा दावा संजय राऊतांनी केला. तर तपास यंत्रणांच्या टार्गेटवर राष्ट्रवादीचे शरद पवारांसह महाविकास आघाडीचे नेते आहेत असा दावाही केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही संजय राऊत यांनी टीका केलीय. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही एका पक्षाचे पंतप्रधान नसून ते अवघ्या देशाचे पंतप्रधान आहे. मोदी हे एका पक्षाचे नेतृत्व करतायेत. ते देशाचे पंतप्रधान आहे, भाजपचे नाही, असा खोचक टोलाही संजय राऊतांनी पंतप्रधानांना लगावला.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!