नागपूर : राज्यातील पोलिसांच्या बदल्यांची गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. पोलीस स्वतः फडणवीसांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवणार आहेत. यावर भाजप आक्रमक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यावर निशाणा साधला आहे. अनिल बोंडे म्हणाले, विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे काम केले. त्यांनी पोलीस बदलीसंदर्भात सर्व माहिती बाहेर काढली होती.
मनसुख हिरेन यांचे हत्या प्रकरणातही त्यांनी महत्त्वाची माहिती उघड केली होती. राष्ट्रवादीचे बहुतेक सर्व नेते भ्रष्टाचाराने माखले आहेत. यामुळेच राज्य सरकारमधील काही मंत्र्यांची टरकली आहे. त्यामुळेच आता देवेंद्र फडणवीस यांचे तोंड कसे बंद करता येईल, यासाठी ही नोटीस पाठविली असल्याचे अनिल बोंडे म्हणाले. फडणवीस यांच्यावरील एक तरी आरोप खरा करून दाखवा, असं आव्हान त्यांनी राज्य सरकारला दिले आहे.
“….अब सब सडेंगे सालोसाल”- राज्यसरकारला इशारा
अनिल बोंडे म्हणाले कि, एकट्या देवेंद्र फडणवीसांनी गैरव्यवहार करणाऱ्यांना सळो की पळो करून सोडले आहे. त्यामुळेच फडणवीस यांना ही नोटीस पाठविण्यात आली आहे. या घटनेचा विरोध करण्यासाठी आम्ही एसपी ऑफिसमध्ये काळी फित लावून विरोध करणार आहोत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख कैदेत आहेत. नबाब मलिकही जेलमध्ये आहेत. आता अनिल परब यांचा नंबरही लवकरच येऊ शकतो. टरबुजा हुआ लाल अब सब सडेंगे सालोसाल, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
महत्वाच्या बातम्या:


