Share

पोलीस पथक “सागर” बंगल्यावर रवाना; फडणवीसांचा जबाब नोंदवणे सुरु

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीसांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी पोलीस पथक आज ११ च्या सुमारास फडणवीसांच्या “सागर” या निवास्थानी दाखल झाले आहे. या पोलीस पथकामध्ये एसपी नितीन जाधव यांच्यासह दोन पोलीस निरीक्षक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सध्या फडणवीसांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान या चौकशीला सामोरे जाण्याआधी फडणवीसांनी भाजपच्या काही प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा देखील केली होती.

देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांना बीकेसी पोलीस ठाण्यात बोलण्यात आले होते. मात्र भाजपने आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे कायदा आणि सुव्यस्था राखण्यासाठी पोलीस स्वतः त्यांच्या घरी जाऊन जबाब नोंदवणार असल्याची माहिती काल दुपारी मिळाली होती. आज सकाळपासूनच सागर बंगल्याबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांसह भाजपची काही नेते मंडळीही त्या ठिकाणी उपस्थित आहेत. दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!