नवी दिल्ली : बेंगलोर येथील श्रीलंकेविरुद्धच्या डे-नाईट कसोटी सामन्यात श्रेयस अय्यरने ज्या प्रकारे खेळी केली आहे. त्यावर बऱ्याच जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातच भारताचा माजी जलदगती गोलंदाज इरफान पठाण यानेही श्रेयसबद्दल एक वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, त्याच्या या डावातील खेळीत खूप क्लास पाहायला मिळाला आहे.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना, तो म्हणाला, “या खेळीत त्याचा जबरदस्त क्लास पाहायला मिळाला. त्याचा फुटवर्कही जबरदस्त होता. जो पुढे ही जात होता, आणि मागे ही राहत होता. ही एक जबरदस्त खेळी होती. आणि त्याने खूप प्रभावित केले आहे. त्याच्या खेळीत खूप सय्यम होता. त्याला माहित होते की, काय करायचे आहे ते. त्याने बरेच चांगले शॉट खेळले. जेवढ्या वेळी तुम्ही ही खेळी पहाचाल, तेवढ्या वेळा तुम्हाला खूप आनंद होईल.”
बेंगलोरमध्ये श्रीलंका आणि भारत यांच्यात दुसरा दिवस रात्र कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना पिंक चेंडूवर खेळला जात आहे. या सामन्यात फिरकी गोलंदाजाला खूप मदत मिळत आहे. त्यामुळे पहिल्याच दिवसात १६ विकेट्स गेल्या आहेत. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव २५२ धावांवरती ऑलआउट झाला. त्यानंतर श्रीलंकेचाही पहिला डाव डगमगताना पाहायला मिळाला. श्रीलंकेचा पहिला डाव ६ बाद ८६ अशा अवघड स्थितीत आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

