Share

पहिल्याच दिवशी ‘द काश्मीर फाइल्स’ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, प्रेक्षकांना अश्रू अनावर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राधे श्याम’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ हे दोन चित्रपट ११ मार्चला रिलीज झाले. या दोन्ही चित्रपटांची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. एकीकडे बाहुबली स्टार प्रभास  आणि पूजा हेगडे यांचा ‘राधे श्याम’ चित्रपट. तर दुसरीकडे अभिनेते अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती  यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट एकमेकांना टक्कर देत आहे. दरम्यान ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.

‘द काश्मीर फाइल्स’चे शो ६३० पेक्षा अधिक स्क्रीन्सवर दिवस-रात्र सुरू आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३ कोटी ५५ लाखांची कमाई केली आहे. विकेण्डला हा चित्रपट जास्त कमाई करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. हरियाणा सरकारने ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतरर प्रेक्षकदेखील भावूक झाले आहेत. प्रेक्षकांना अश्रू अनावर झाल्याचे व्हिडीओ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटात काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवर होणारे अत्याचार आणि आजच्या तरुणांच्या मनात सुरू असलेल्या संघर्षाची कथा रेखाटण्यात आली आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, अनुपम खेर आणि दर्शन कुमार हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!