Share

शॉर्टसर्किटने उस जळाला? तर अशी मिळवा आर्थिक मदत!

Published On: 

🕒 1 min read

लासलगाव : अवकाळी पावसामुळे आणि बदलत्या वातावरणामुळे येवला तालुक्यातील दहेगाव-पाटोदा शिवारातील अनेक पिकांचे नुकसान होत असताना पाहायला मिळाले. अशातच आणखी एका संकटाने वेढा घातला, याठिकाणी वादळी वाऱ्यामुळे वीज तारांचे घर्षण झाले व त्याची ठिणगी ऊसाच्या फडामध्ये पडली आणि अवघ्या काही वेळेत १ एकरातील उस जळून खाक झाला.

अवघ्या एका ठिणगीमुळे सुनील माणिकराव जाधव यांचा एक एकरातील ऊस जळाला. आग लागताच शेतकऱ्यांनी विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोसाट्याचे वारे असल्याने अवघ्या काही वेळात एकरातील ऊस आगीने जळून खाक झालेला पाहायला मिळाला. मागच्या काही दिवसांपासुन वीज तारा लोंबकाळत असल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

महावितरणकडून मदत अशी मिळवा –

महावितरणच्या चुकीमुळे ऊस जळाला असेल तर शेतकऱ्याला महावितरणच्या विभागीय कार्यालयात संबंधित कागदपत्रे अर्जासोबत जमा करावे लागतात. यामध्ये मागील ३ वर्षाचा सातबारा उतारा, महसूल विभागाचा आणि पोलीसांनी केलेला पंचनामा, किती क्षेत्रावरील ऊस जळाला आहे त्याचे फोटो, ऊसाबरोबरच त्या क्षेत्रातील ठिंबक किंवा पाणीपुरवठा करणारे इतर साहित्य हे या घटनेत जळाले असेल तर त्याचे बील. तसेच साखर कारखान्यांची मागच्या ३ वर्षांची बीलंही अर्जासोबत जोडा.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!