🕒 1 min read
जळगाव : काही दिवसांपूर्वी विधानसभेत बोलत असतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्यातील सरकार विरोधकांना विविध प्रकरणांमध्ये अडकवण्याचे षडयंत्र रचत असून या कामात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavhan) यांना हाताशी धरले आहे असा गंभीर आरोप केला होता. दरम्यान, या प्रकरणावर आता राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना गुलाबराव पाटील म्हणाले की,‘या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने त्यावर बोलणे उचित होणार नाही. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यासंदर्भात विधानसभेत सोमवारी खुलासा करणार आहेत. त्यानंतर याप्रकरणातील नेमके सत्य काय ते बाहेर येईल. म्हणजेच दूध का दूध पानी का पानी होईलच’, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर प्रवीण चव्हाण यांनी देखील उत्तर दिले असून ते म्हणाले आहेत की,‘या व्हिडीओमध्ये वाक्यांची मोडतोड करण्यात आली असून सर्व रेकॉर्डिंग समोर येण्याची गरज आहे.’ तसेच मूळचा जळगावचा असलेला तेजस मोरे नावाचा तरुण अशील म्हणून आपल्याकडे आला आणि त्याने हे स्टिंग ऑपरेशन केले आहे. यातून या स्टिंग ऑपरेशनमधील जळगाव कनेक्शन उघड होते.
महत्वाच्या बातम्या
- “आठवलेंचा पक्ष भाजपच्या दावणीला, ते काय शिवसेनेवर…”, गुलाबराव पाटलांचे टीकास्त्र
- नवोदितांचा अभिनयापेक्षा ग्लॅमरवर फोकस जास्त; अभिनेत्री उषा नाडकर्णी
- इंग्लंड वेस्टइंडीज पहिला कसोटी सामना अनिर्णीत, तर कर्णधार जो रूटची…
- पोषक वातावरणामुळे सर्वच पिकांचे उत्पादन वाढणार!
- “….अब सब सडेंगे सालोसाल”- अनिल बोंडेंचा राज्यसरकारला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
