Share

मयूर शेळकेंचा दिलदारपणा ! बक्षिसाच्या 50 हजारांपैकी निम्मी रक्कम अंध मातेला देणार…

Published On: 

मुंबई : परिसरातील वांगणी रेल्वे स्थानकात रेल्वेरुळावर पडलेल्या चिमुकल्याचा जीव पॉईंटमनने वाचवला असून हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. यात एका सेकंदाचाही उशीर झाला असता तर त्या चिमुकल्याचा जीव गेला असता. या घटनेतील चिमुकल्याचा जीव वाचवणारे मयूर शेळके यांचे कौतूक करत रेल्वेमंत्र्यांनी त्याचे आभार मानले आहेत.

वांगणी रेल्वे स्थानकावर एक अंध महिला मुलासह चालत होती. प्लॅटफॉर्मच्या कडेला असताना मुलाचा तोल जाऊन तो रुळावर पडला. याच दरम्यान रेल्वे प्लॅटफॉर्मवर येत होती. त्यामुळे ती महिला आरडाओरड करत होती. त्याच वेळी मयूर शेळके देवदूतासारखा धावत आला आणि त्याने मुलाला प्लॅटफॉर्मवर ढकलले. यात सेकंदाचाही विलंब झाला असता तर त्या मुलाचे प्राण गमवावे लागले असते. मयूर शेळकेने त्या मुलाला जीवदान दिले आहे.

वांगणी रेल्वे स्थानकात रुळावर पडलेल्या चिमुकल्याचा जीव वाचवणाऱ्या मयुर शेळकेने पुन्हा एकदा आपल्या दिलदारपणाचे दर्शन घडवलं आहे. मयुरने त्याला मिळणाऱ्या बक्षिसातील अर्धी रक्कम अंध माता संगीता शिरसाट यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच रेल्वेकडून मिळालेल्या 50 हजारांपैकी 25 हजार रुपये मयुर शिरसाट कुटुंबाला देणार आहे. आधी शौर्य गाजवून मनं जिंकणारा मयुरने आता दिलदारपणा दाखवत त्याच्याप्रती असणारा आदर आणखी वाढला आहे.

दरम्यान, संगीता शिरसाट या वांगणीच्या एका चाळीत भाड्याच्या खोलीत मुलासह राहतात. रेल्वेत छोट्यामोठ्या वस्तू विकून त्या आपला उदरनिर्वाह करतात. मुलगा साहिल हाच त्यांचा एकमेव आधार असून त्याला वाचवणारा मयुर हा या अंध मातेसाठी खऱ्या अर्थानं देव ठरला आहे. आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवणाऱ्या देवमाणसाचा सन्मान करा, अशी मागणी या अंध माऊलीने केली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!