मुंबई : कोरोना संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंधरा दिवसांसाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. संपूर्ण राज्यात 144 कलम लागू केले. अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा बंद राहतील. सिनेमा आणि टीव्ही मालिकांचे शूटिंगही बंद राहणार आहे.
अशातच बॉलीवूड प्रमाणे मालिकांनी आता मुंबई बाहेर जात त्यांचे चित्रिकरण सुरु ठेवले आहे. यात स्टार प्रवाह चॅनेलच्या सुपरहिट मालिकांचा समावेश आहे. रसिकांचे मनोरंजन करण्यात ब्रेक लागू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा, स्वाभिमान यासारख्या बहुतांश मालिका सध्या रंजक वळणावर आल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मनोरंजनात कुठलाही व्यत्यय येऊ नये, याची काळजी स्टार प्रवाह चॅनलकडून घेण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- शासनाच्या नव्या निर्बंधांमुळे लग्न करू इच्छिणाऱ्या मंडळींची होणार पंचाईत, जाणून घ्या नवी नियमावली
- ‘माझ्याकडेही त्यांच्या अनेक प्रकरणांचं मटेरियल तयार आहे, ते बाहेर काढावं लागेल’
- राज्याला २६ नव्हे तर ५० हजार दिवसाला रेमडेसिवीर इंजेक्शन द्या – नवाब मलिक
- महाराष्ट्राचा असा छळ कश्यासाठी ? जितेंद्र आव्हाड यांचा संतप्त सवाल
- पाकिस्तानात आलिशान हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट, चिनी राजदूताला मारण्याचा होता डाव ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
