Share

अखेर पुण्यातील चिमुकलीला न्याय ; नराधमाला फाशीची शिक्षा

Published On: 

🕒 1 min read

पुणे : २०२१च्या फेब्रुवारी महिन्यात पुणे जिल्ह्यातील पानशेत परिसरात एका अडीच वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. आता याच नराधमाला आज न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. संजय काटकर असे नराधमाचे नाव असून २०२१ च्या फेबुवारी महिन्यात १५ तारखेला त्याने एका चिमुकलीवर खाऊ आणि पैश्याचे अमिश दाखवून बलात्कार केला होता आणि नंतर तिची हत्या सुद्धा करण्यात आली होती. या बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. मात्र त्या अडीच वर्षाच्या चिमुकलीला आता न्याय मिळाला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या या घटनेत पुणे पोलिसांनी अवघ्या ४८ तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या. पुणे जिल्हा व सत्र न्यायालय न्यायाधीश संजय देशमुख यांनी नराधाम संजय काटकर याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

काय घडलं होत नेमकं त्या दिवशी ?

१५ फेब्रुवारी २०२१ रोजी अडीच वर्षाची पीडित मुलगी तिच्या आई – बाबांबरोबर पानशेत परिसरात होती. तिचे आई बाबा रोजंदारीवर काम करत होते. आई बाबा काम करत असताना अडीच वर्षाची पीडित मुलगी आसपास दंगा मस्ती करत होती. अडीच वर्षाची छोटी मुलगी एकटीच आहे हे बघून नराधम संजय काटकर तेथे गेला आणि तिला पैश्याचे व खाऊचे आमिष दाखवून तिला निर्जन स्थळी घेऊन गेला. निर्जन स्थळी घेऊन गेल्यावर नराधम संजय काटकर याने चिमुकलीवर बलात्कार केला आणि तिची नंतर आमनुष्य हत्या पण केली. आज सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यावर महाराष्ट्रातील जनतेने आनंद व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!