Share

पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश; महेश मांजरेकरांना कोर्टाचा दिलासा…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: महेश मांजरेकर यांच्यावर एका चित्रपटा संदर्भात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला गेला. या चित्रपटाचं नाव ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ असे आहे. या चित्रपटातील महेश मांजरेकरांनी अल्पवयीन मुलांची लैगिक मानसिकता अस्ताव्यस्त दाखविल्याने गुन्हा दाखल केला होता.

या संदर्भात महेश मांजरेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. हायकोर्टाने मुंबई पोलिसांना पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही करवाई करण्यात येऊ नये असे निर्देश दिले आहे. लहान मुलांच्या दृश्यांवरून हा गुन्हा पोक्सो आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले आहे.

चित्रपटात दाखवले नेमके काय –

‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या चित्रपटात महेश मांजरेकर यांनी लहान मुलांची एक वेगळी कथा दाखविण्याचा प्रयत्न केला गेला. यामध्ये अल्पवयीन मुलांचे नात्यातील प्रौढ महिलेशी संबंध दाखविण्यात असल्यामुळे गिरन गावातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गिरनगाव आणि चाळीतील मुलांची या चित्रपटामुळे दिशाभूल होत असल्याचे देखील अनेकांनी सांगितले. या संदर्भात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आवश्यक कारवाई करण्याचा आदेश मुंबई सत्र न्यायालयातील पोक्सो कोर्टाने दिला होता.

राज्य सरकारने केला विरोध –

न्यायमूर्ती एस.एस शिंदे आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणासंदर्भात सुनावणी देखील झाली होती. पण महेश मांजरेकर यांनी अटकेची कारवाई रोखण्यात यावी अशी मागणी मुंबई पोलिसांना केली होती परंतु राज्य सरकारने याला विरोध केला होता. त्यामुळे हायकोर्टाने दिलासा देण्यास नकार देत महेश मांजरेकर यांना सोमवारी खंडपीठापुढे दाद मागण्याचे निर्देश दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!