Share

पाकिस्तानच्या पंतप्रधानांची लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

Published On: 

मुंबई : भारतरत्न, गणसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ९३ व्या वर्षी मुंबई मधील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात निधन झालं. त्यांना आधी कोरोना आणि नंतर न्यूमोनियाने ग्रासलं होत. त्यांची न्यूमोनियाशी झुंज आज अपयशी ठरली. लता मंगेशकर यांचे जगभरात अनेक चाहते होते. त्यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने फक्त भारतातीलच नव्हे तर जगभरातील संगीत रसिकांच्या मनात घर केले होते. त्यांचे भारताबाहेर पण अनेक छाहते आहेत. आजच अनेक पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यात पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम, पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार वकार युनूस आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष रमीझ राजा यांचा पण समावेश आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी गोलंदाज अष्टपैलू खेळाडू इम्रान खान यांचा पण समावेश आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनाही ट्वीट करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली केली आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाने भारतीय उपखंडाने एक महान जगप्रसिद्ध गायिका गमावली आहे, असे ट्वीट इम्रान खान यांनी केलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत इम्रान खान आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात की, ‘लता मंगेशकर यांच्या निधनाने भारतीय उपखंडाने एक महान जगप्रसिद्ध गायिका गमावली आहे. त्यांची गाणी ऐकून जगभरातील अनेक लोकांना आनंद मिळाला.’

महत्वाच्या बातम्या :     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!