Share

अखेरचा हा तुला दंडवत… लतादीदी अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Published On: 

मुंबई: स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा आवाज कायमचाच हरपला आहे. आज (६ फेब्रुवारी) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी (Lata Mangeshkar dies at 92) त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या २७ दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज त्यांचे निधन झाले.

आपल्या स्वरांनी संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर यांचं शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांसह अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. सिनेसृष्टी तसेच संगीत क्षेत्रातील मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते. लतादीदी यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी देखील त्यांची गाणी आणि त्यांचे सूर अजरामर आहेत.

प्रभूकुंज निवासस्थानावर दुपारी १२.३० ते ३ वाजेपर्यंत लतादीदींचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर लतादीदींचं पार्थिव दादर शिवाजी पार्कमध्ये आणलं गेलं. त्यापूर्वी पोलिसांनी लतादीदींना मानवंदना दिली. दुपारी तीन वाजता लतादीदींची अंत्ययात्रा निघाली होती. यावेळी लतादीदींचं अंतिम दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गर्दी जमली होती.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना ‘लता दीदी’ म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी ९८० पेक्षा जास्त हिंदी सिनेमांची गाणी गायली आहेत. तीस हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये त्यांनी गायन केलं आहे. त्यांना १९८१ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. तसेच २००१ साली लता मंगेशकर यांना ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!