🕒 1 min read
मुंबई : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीवरून सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. याकूब मेमन याची कबर फुलांनी सजवण्यात आल्याचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यावरून भाजपाने आता शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. या सर्व प्रकरणावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. पेंग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम जाहीर करावा, शिवसेना दाऊदचा प्रचारक म्हणून काम करते असा खोचक टोला शेलारांनी लगावला आहे.
याकूब मेनन जिवंत ठेवला पाहिजे ही काँग्रेसनं मांडलेली भूमिका होती. त्यावेळी केंद्रात कुणाचं सरकार होतं? गृहमंत्री कोण होते? याचे उत्तर काँग्रेसनं पहिलं द्यावं. सुप्रीम कोर्टात काँग्रेसनं काय भूमिका मांडली होती? याकूब मेननला जिवंत ठेवा अशी मागणी काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनी केली होती. सत्तेत असताना शिवसेना दाऊदची समर्थक होती हे आम्ही पाहिले. शिवसेना आता दाऊदची प्रचारक झाली आहे. पाकिस्तानच्या मदतीने दाऊदनं भारतावर, मुंबईवर हल्ला केला. त्यातला प्रमुख आरोपी याकूब मेनन फाशी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने झाली. मग त्याच्या कबरीवर सुशोभिकरणाची परवानगी दिली कशी? अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. कब्रिस्तानची जबाबदारी महापालिकेकडे असते. महापौर तुमचा, मुख्यमंत्री तुम्ही आणि दाऊदच्या माणसाच्या कबरीचं सुशोभिकरण सुरू आहे. पेग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम सुरू करून पेग्विन सेनेच्या युवा अध्यक्षांनी त्याचे नेतृत्व करावे असा टोला मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर घणाघात केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Nirmala Sitaraman | “महागाई कमी करणं आता आमचं प्राधान्य नाही…” – निर्माला सीतारामन
- Ashish Shelar | “पेंग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम जाहीर करावा”
- Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी – चंद्रशेखर बावनकुळे
- Chandrasekhar Bawankule | “मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी किती तडजोड केली, याचे स्पष्टिकरण त्यांनी द्यावे”
- Atul Bhatkhalkar | “गृहमंत्र्यांबाबत बोलण्यापुर्वी उद्धव ठाकरेंनी त्यांची लायकी बघावी…”, अतुल भातखळकरांचा ठाकरेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
