🕒 1 min read
मुंबई : 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये याकूब मेमनच्या कबरीला सजवण्यात आलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच या मुद्यावरून भाजप पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य-
मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी किती तडजोड केली, याचं स्पष्टिकरण त्यांनी द्यावे,असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. या घटनेमुळे महाराष्ट्र कलंकित झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी देखील बावनकुळे यांनी केली आहे.
आम्ही कट्टर हिंदूत्ववादी आहोत. आमचे हिंदूत्व कोणीही हिरावू शकत नाही, असं उद्धव ठाकरे वारंवार सांगत असतात. मग त्यांनी ही तडजोड का केली?, असा सवाल बावनकुळे यांनी केला आहे.
तसेच उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या विरोधात धनुष्यबाण हातात का घेतला नाही?. कबरीच्या सुशोभीकरणाकडे तत्कालीन गृहमंत्र्यांनी दुर्लक्ष का केले? जर याबाबत गृहमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना कळवले असेल तर ते गप्प का बसलेत? उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी कोणती पातळी गाठली?, असे बरेच सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी याठिकाणी उपस्थित केले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Atul BHatkhalkar | जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून अतुल भातखळकरांनी राष्ट्रवादीवर केला हल्ला म्हणाले…
- Amravati | अमरावतीतून बेपत्ता झालेली मुलगी साताऱ्यात सापडली
- Amit Shaha | मुंबई दौऱ्या दरम्यान अमित शहांच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा
- Shivsena | “आयकर विभागाच्या धाडी म्हणजे राजकीय फंडिंग”
- Sanjay Raut | संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
