🕒 1 min read
मुंबई : 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये याकूब मेमनच्या कबरीला सजवण्यात आलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच या मुद्यावरून भाजप पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
आशिष शेलार यांचे वक्तव्य-
पेंग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम जाहीर करावा, शिवसेना दाऊदचा प्रचारक म्हणून काम करते, असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
याच मुद्यावरून भाजप पक्षाच्या इतर नेत्यांनीही शिवसेनेवर हल्ला केला आहे. यामध्ये या घटनेमुळे महाराष्ट्र कलंकित झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तसेच ते पुढे असंही म्हणाले की, मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी किती तडजोड केली, याचं स्पष्टिकरण त्यांनी द्यावं.
दरम्यान, याकूब मेमनच्या कबरीचा विषय सध्या चांगलाच रंगला असून, सत्ताधारी पक्षनेत्यांनी शिवसेना पक्षावर केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Atul BHatkhalkar | जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून अतुल भातखळकरांनी राष्ट्रवादीवर केला हल्ला म्हणाले…
- Amravati | अमरावतीतून बेपत्ता झालेली मुलगी साताऱ्यात सापडली
- Amit Shaha | मुंबई दौऱ्या दरम्यान अमित शहांच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा
- Shivsena | “आयकर विभागाच्या धाडी म्हणजे राजकीय फंडिंग”
- Sanjay Raut | संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
