Share

पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये धक्काबुक्की, तणावाचे वातावरण

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर : पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी मंदिर परिसरात गर्दी सुद्धा झाली होती. 
 
भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांना काळे फासण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Srikant Deshmukh) आणि कार्यकर्त्यांनी हुसकावून लावले होते. 
 
आचार्य तुषार भोसले हे महाविकास आघाडी सरकारवर टिकेच बाण सोडत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यावर नाव न घेता टीका केली. ही टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आचार्य तुषार भोसले यांचा विरोध करत त्यांच्या अंगावर काळे टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या गळ्यातील पक्षाचा पंचा काढून श्रीकांत देशमुख यांनी कार्यकर्त्यांना हिसकावून लावले. 
 
यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “पंढरपूर पोटनिवडणुकीतल्या पराभवामुळे आलेल्या वैफल्यातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे कार्यकर्ते बाहेरच आलेले नाहीत. त्यामुळेच आमच्या आचार्य तुषार भोसले यांच्याशी गैरवर्तनाचा प्रकार घडला. या प्रकाराचा मी तीव्र निषेध करतो. संबंधितांवर सरकार कारवाई करणार की त्यांना पाठीशीच घालणार?”
महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!