🕒 1 min read
नवी-दिल्ली : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे राज्यात २४ डिसेंबरला रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु त्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील सातत्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. असे असतांनाच आता नाईट कर्फ्यू लावण्यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन(Saumya Swaminathan) म्हणाल्या आहेत.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की,’कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू लावण्यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नाही. भारतासारख्या देशांनी या विषाणूला आवर घालण्यासाठी वैज्ञानिक आधारांवर धोरण ठरवायला हवं. तसेच विषाणूला रोखण्यासाठी विज्ञाना वर आधरित, उपाययोजना आवश्यक आहेत. अशा प्रकारच्या उपाययोजनांची एक यादीच करता येऊ शकेल’, असे स्वामीनाथन म्हणाल्या आहेत.
दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या आहेत की,’जाहीर कार्यक्रमांमुळे, मनोरंजनाच्या ठिकाणी विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे अशा ठिकाणांवर निर्बंध टाकणे गरजेचे आहे. भारतीयांनी घाबरून जाऊ नये, पण सतर्क राहणे आवश्यक आहे’, असेही स्वामीनाथन यावेळी म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोरेगाव भीमाचा इतिहास महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे’
- आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया- मुख्यमंत्री ठाकरे
- ‘या सरत्या वर्षातील नकारात्मकता मागे सारून भविष्यकाळात नव्या उमेदीने जगण्याचा संकल्प करूया’
- ‘…तर कठोर निर्बंध लागू करणार’, अजित पवारांचा इशारा
- ठाकरे सरकारने ‘भ्रष्टाचार युक्त महाराष्ट्र’ केले आपण ‘भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र’ करूया- किरीट सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
