Share

“महामानव महात्मा फुले यांना भारतरत्न मिळाला पाहिजे”, रुपाली पाटलांची मागणी

Published On: 

मुंबई : १ जानेवारी १८४८ साली महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या थोर समाजसुधारकांनी पुण्यातील भिडे वाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली. करोडो महिलांच्या आयुष्याचं सोनं करणाऱ्या या महामानवांना भारतरत्न मिळाला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी क्राँग्रेस नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी केली आहे. याबाबत रुपाली पाटील यांनी ट्विट करत राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ही मागणी केली आहे.

याबाबत रुपाली पाटील ठोंबरे ट्विटमध्ये म्हणाल्या, ‘१ जानेवारी १८४८ साली भारतातील मुलींसाठीची पहिली शाळा भिडे वाडा पुणे येथे महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई जोतिराव फुले यांनी सुरू केली. करोडो महिलांच्या आयुष्याचं सोनं करणाऱ्या या महामानवांना भारतरत्न मिळाला पाहिजे.’ असे रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या आहेत.

यापूर्वी महात्मा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी अनेकदा करण्यात आली आहे. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनीही लोकसभेत ही मागणी केली होती. थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी खा. श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली होती.

महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुण्यात झाला. ते सत्यशोधक समाजाचे प्रणेते होते. जोतिबा फुले यांनी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मोठे काम केले आहे. शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची त्यांनी मांडणी केली. भारतीय विचारक, समाजसुधारक, लेखक अशी त्यांची ओळख आहे. ब्रिटिशकाळात शेतकऱ्यांची बाजू परखडपणे मांडणारे, महिला तसेच विधवांसाठी काम करणारे जोतिबा फुले महान समाजसुधारक होते. त्यांच्या कार्याचा गौरव होणे काळाची गरज आहे. असे बारणे म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!