🕒 1 min read
मुंबई : जम्मू मधील माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे. या घटनेत एकूण १२ भाविकांचा मृत्यू झाला. आज नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्याने शोक व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत २० भाविक जखमी झाले आहेत. त्यामुळे देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.
शरद पवार ट्विट करत म्हणाले, ‘वैष्णोदेवी मंदिराबाहेर चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाला व अनेक भाविक जखमी झालेत. दुर्घटनेतील मृतांच्या आप्त-परिवारांच्या दुःखात सहसंवेदना! धार्मिक प्रार्थनास्थळांनिकट गर्दी व्यवस्थापनाचा व आपत्कालीन नियंत्रणाचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला.’ असे शरद पवार म्हणाले आहेत.
वैष्णोदेवी मंदिराबाहेर चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाला व अनेक भाविक जखमी झालेत. दुर्घटनेतील मृतांच्या आप्त-परिवारांच्या दुःखात सहसंवेदना!
धार्मिक प्रार्थनास्थळांनिकट गर्दी व्यवस्थापनाचा व आपत्कालीन नियंत्रणाचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला.— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 1, 2022
दरम्यान जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून ही चेंगराचेंगरी अतिशय भीषण होती. याठिकाणी बचाव पथक तसेच जवान यांच्याकडून बचावकार्य राबविण्यात येत आहे. मात्र या घटनेवरून अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहे. या भागात ५० हजार भाविक जमल्याची माहिती समोर येत आहे. त्याचे नियोजन करण्यात न आल्याने ही घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वैष्णो देवी यात्रेच्या नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित केला जात असतानाच जखमींना तसेच मृतांना मदतीची घोषणाही करण्यात आली आहे. मृतांना १० लाख तर जखमींना २ लाखांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तर “माता वैष्णव देवी तीर्थक्षेत्रातील दुर्घटनेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मी तातडीने कटरा येथे जात आहे’, असे ट्विट केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे राज्यांना पत्र; दिल्या ‘या’ सूचना
- भीमा नदीच्या तीरावर उभारलेला क्रांतीस्तंभ हा केवळ स्तंभ नाही तर…- जितेंद्र आव्हाड
- नववर्षाच्या पहिल्या दिवशी १० कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान देणार पीएम किसानचा हप्ता
- ‘अनेक संकटं येऊन गेली पण समाधान याचे की…’,फडणवीसांकडून नवंवर्षाच्या शुभेच्छा
- …म्हणून बैलगाडा शर्यत हणून पाडली; आढळराव पाटलांचा प्रशासनावर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
