मुंबई : देशासह अनेक राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा विषाणूने देखील अनेक राज्यांमध्ये शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये निर्बंध लादले आहेत. तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असताना देशात जर कोरनाची तिसरी लाट आली तर त्याला भाजप जबाबदार असेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात मोठ्या संख्येने कोरोनाची रुग्णसंख्या वाढली असून जवळपास दीड हजार ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही चिंताजनक असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार रंगात आला आहे. या प्रचार सभांना मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. या मुद्द्यावरून नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रातील मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) लोकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवायला, मास्क लावायला सांगत आहेत. पण तरीही भाजपचे लोक त्यांचे ऐकत नाही. उत्तर प्रदेशमध्ये गृहमंत्री, योगी हजारोंच्या संख्येने लोक जमवतात. त्यांच्या प्रचारसभा थांबत नाहीत. इतर राज्यांत निवडणुका असताना दुसरी लाट आली, त्याचप्रमाणे तिसरी लाट निर्माण करण्यात भाजपच्या लोकांचा हात राहील हे स्पष्ट आहे, असे नवाब मलिक म्हणाले आहेत.
दरम्यान, भाजपला उत्तर प्रदेशात सत्ता जाताना दिसत आहे. योगींचा चेहरा बाजूला करून त्यांना उत्तर प्रदेशात निवडणुका घ्यायच्या आहेत. त्यासाठी निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव भाजप खेळू शकते, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांना तुम्ही ओळखायची गरज नाही; मलिकांचा राणेंना टोला
- “गल्लीत क्रिकेट जिंकणारे म्हणतात वर्ल्डकप जिंकू”
- “परबांनी शपथनामा क्रूझ पार्टीत पत्ती मारुन लिहीला नाही ना?”, मुनगंटीवारांचा सवाल
- ‘कोरेगाव भीमाचा इतिहास महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे’
- आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया- मुख्यमंत्री ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

